विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही मराठी कविता | Vizlo Aaj Jari mi Poem Marathi

विझलो आज जरी मी  - Vizlo Aaj Jari mi Poem Marathi: सुरेश भट अतिशय सुंदर व सखोल संदेश देणाऱ्या कविता लिहिणारे एक लेखक होते. सुरेश भट यांच्या कविता मराठी वाचकांना आजही अत्यंत प्रिय आहेत. अशीच सुरेश भट यांची एक प्रसिद्ध कविता विझलो आज जरी मी ही आहे. या कवितेला अनेक मराठी वाचक व विद्यार्थ्यंनद्वारे वाचली व गायली जाते. या लेखात आम्ही आपल्यासाठी Vizlo Aaj Jari Mi या कवितेचे lyrics घेऊन आलेलो आहोत. 
विझलो आज जरी मी मराठी कविता - Vizlo Aaj Jari mi Poem Marathi


विझलो आज जरी मी,

हा माझा अंत नाही.....

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही


छाटले जरी पंख माझे,

पुन्हा उडेन मी.

अडवू शकेल मला,

अजुन अशी भिंत नाही


माझी झोपडी जाळण्याचे,

केलेत कैक कावे..

जळेल झोपडी अशी,

आग ती ज्वलंत नाही..


रोखण्यास वाट माझी,

वादळे होती आतूर..

डोळ्यांत जरी गेली धूळ,

थांबण्यास उसंत नाही..


येतील वादळे, खेटेल तुफान,

तरी वाट चालतो..

अडथळ्यांना भिवून अडखळणे,

पावलांना पसंत नाही

-सुरेश भट

Watch Videoतर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत कवि सुरेश भट यांची विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही ह्या कवीचे भावगीत शेअर केले. Vizlo Aaj Jari mi Poem Marathi अनेकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे ही गोष्टी आम्ही योग्य पद्धतीने जाणून आहोत.

विझलो आज जरी मी या कवितेला इतराँसोबत ही नक्की शेअर करा. धन्यवाद..

Post a Comment

أحدث أقدم