तुम्ही काय म्हणता - सुरेश भट कविता लीरिक्स

सुरेश भट लिखित कविता तुम्ही काय म्हणता पुढे आपणास देण्यात आली आहे.


 तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही

मी जिवंत आहे - माझा हा प्रमाद नाही !


मैफलीत मंबाजींच्या का म्हणून बोलू

कुणालाच कोणाचीही इथे दाद नाही


हा अथांग सागर उसळे जरी यातनांचा

परत मी घरी जाणारा सिंदबाद नाही


कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना

पुढे काय झाले माझे ? मला याद नाही !


तुला मीच रडतारडता धीर देत आहे

वादग्रस्त माझे अश्रु ह्यात वाद नाही


सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी

बाद होत गेले सारे, मीच बाद नाही

- सुरेश भट 

Post a Comment

أحدث أقدم