ओल्या सांजवेळी - प्रेमाची गोष्ट | Marathi love poem

 ओल्या सांजवेळी प्रेमाची गोष्ट - Marathi love poem
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी

तशी तू जवळी  ये जरा


कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी

तशी तू हलके बोल ना


आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके

सुख हे नवे सलगी करे, का सांग ना


सारे जुने दुवे, जळती जसे दिवे

पाण्यावरी  जरा सोडून देऊया


माझी ही आर्जवे, पसरून काजवे

जातील  या नव्या वाटेवरी तुझ्या


रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे

पुसुया जुन्या पाउल खुणा

सोबत  तुझी साथ दे


वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा

ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे


डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी

ओळख आता खरी होऊन जाऊ दे


सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला

मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

प्रेम कविता मराठी


Artists

गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे - स्वप्नील बांदोडकर
संगीत : अविनाश - विश्वजित 
चित्रपट : प्रेमाची गोष्ट 
Lyrics : Ashwini Shende
Singer : Bela Shende - Swapnil Bandodkar 
Music: Avinash - Vishwajeet  
Movie : Premachi Goshta


Post a Comment

Previous Post Next Post