Wednesday, May 18, 2011

परी म्हणू की सुंदरा - गुरु ठाकूर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
परी म्हणू की सुंदरा तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली

तिचे वळून पाहणे
मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासणे
हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली

हजारदा ती भेटते
बोलुबोलु वाटते
बोलणे मनातले
परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली

गीत : गुरु ठाकूर
संगीत : अवधूत गुप्ते
स्वर : अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर


Get this widget | Track details | eSnips Social DNA( Pari mhanu ki sundara tichi tarha ase jara nirali - Guru Thakur )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.