Wednesday, May 18, 2011

काही बोलायाचे आहे - कुसुमाग्रज

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही

गीत : कुसुमाग्रज
संगीत : यशवंत देव
स्वर : श्रीधर फड
के

Get this widget | Track details | eSnips Social DNA( Kahi bolayache aahe pan bolanaar naahi, devalachya daramadhe bhakti tolnaar naahi - Kusumagraj)

3 comments:

  1. किती सुंदर कविता आहे ना ? आभार आभार ! खूप खूप आभार ! :)

    ReplyDelete
  2. अगदी खरं अनघा. मी सुद्धा ही पूर्ण कविता पाहिल्यांदाच वाचली. काय सुंदर काव्य आहे ! कुसुमाग्रजांना सलाम !

    ReplyDelete
  3. फार सुंदर कविता आहे ,ताल सूर सुद्धा फार छान आहे .कवी कुसुमाग्रजांना नमस्कार .

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.