Monday, May 16, 2011

कोटी कोटी रुपे तुझी - यशवंत देव

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे

बीज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास
तुझा स्पर्ष आणुन देतो, फुलाला सुवास
चराचरा रंगवीशी, रंग तुझा कोणता रे ?
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे

कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला
जनी निर्जनीही तूझा, पाय रोवलेला
तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे ?
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे

खरे रूप देवा तूझे, कोणते कळेना
तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे ?
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे

गीत - यशवंत देव
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - सुरेश वाडकर

Get this widget | Track details | eSnips Social DNA( Koti Koti Rupe tuzi, koti surya chandra taare - Yashwant Deo )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.