Saturday, May 14, 2011

या जन्मावर, या जगण्यावर - मंगेश पाडगावकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते


Get this widget | Track details | eSnips Social DNA( Ya Janmawar ya jaganyawar shatada prem karawe - Mangesh Padgaokar )

2 comments:

  1. शंतनू खूप छान कलेक्शन करतोयस रे !!! सर्व गाण्याचे विडीओ, लिरिक्स सर्व काही एका ठिकाणीच मिळतेय.keep it up man...

    ReplyDelete
  2. आभार आशीष! तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य होतय.

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.