Sunday, May 8, 2011

सांग कधी कळणार तुला - मधुसूदन कालेलकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला, धुंदणाऱ्या सुरातला?

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला

जुळता डोळे एक वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला, दोन वेड्या जीवातला

गीत : मधुसूदन कालेलकर
संगीत : एन्‌. दत्ता
स्वर : सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर
चित्रपट : अपराध


Get this widget | Track details | eSnips Social DNA( Sang kadhi Kalanaar tula , bhav mazya manatala - Madhusudan kalelkar )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.