Saturday, May 7, 2011

कांदे पोहे - अवधुत गुप्ते

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांति
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवि शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
आले मिटूनी लाजाळुपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

दूर देशीच्या राजकुमारा ची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतास मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

भुतकाळच्या धुवून अक्षता तांदुळ केले ज्यांनी
आणि सजवाला खोटा रुखवत झाडांच्या फाद्यांनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरच्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

गीत : अवधुत गुप्ते
स्वर् : सुनिधी चौहान
संगीत : अवधुत गुप्ते


Get this widget | Track details | eSnips Social DNA

( Ayushya he chhuliwaralya kadhaitale kande pohe - Avadhoot Gupte )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.