Saturday, April 30, 2011

जे वेड मजला लागले - शांता शेळके

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ?
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ?

मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणि बोलतो शब्दात ते रंगेल का ?

हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो
जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का ?

माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे
सर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का ?

गीत : शांता शेळके
संगीत : वसंत पवार
स्वर : आशा भोसले, सुधीर फडके


Get this widget | Track details | eSnips Social DNA( Je ved majala lagale , tujala hi te laagel ka - Shanta Shelke )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.