Wednesday, April 27, 2011

कधी सांजवेळी - सौमित्र

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी, पाहशील का ?
पाहशील का ?

तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा, वाहशील का ?
वाहशील का ?

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी राहशील का?
राहशील का?

तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही साहशील का?
साहशील का?

गीत : सौमित्र
संगीत : मिलींद इंगळे
स्वर: मिलींद इंगळे


( Kadhi Sanj veli mala aathavuni - Soumitra )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.