Tuesday, April 12, 2011

असा बेभान हा वारा - मंगेश पाडगांवकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

गीत :मंगेश पाडगांवकर
गायक :लता मंगेशकर
संगीत :पं. हृदयनाथ मंगेशकर


( Asa bebhan ha wara , Kuthe hi naav mi neu - Mangesh Padgaokar)

2 comments:

Please comment. Your review is very important for me.