Monday, March 14, 2011

शब्दांच्या पलिकडले - मंगेश पाडगावकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ?
 ...... घडू नये ते घडले ... शब्दांच्या पलिकडले

होय म्हणालिस नकोनकोतुन
तूच व्यक्त झालीस स्वरातुन
नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले
 ...... घडू नये ते घडले ... शब्दांच्या पलिकडले

आठवते पुनवेच्या रात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले
 ...... घडू नये ते घडले ... शब्दांच्या पलिकडले

गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी


( Shabdawachun kalale saare shabdanchya palikadale - Mangesh Padgaokar )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.