Monday, March 28, 2011

तळव्यावर मेंदीचा अजुन रंग ओला - शांताराम नांदगावकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
तळव्यावर मेंदीचा अजुन रंग ओला,
माझ्या मनी, प्रीत तुझी, घेते हिंदोळा ||धॄ||

गाईलेस डोळ्यांनी, एक निळे गाणे,
बट हळवी, वार्‍यातील वेचिते तराणे,
नकळत, तव हात प्रिये,हाती मम आला ||१||

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली,
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली,
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला ||२||

ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात,
मिटुनी पंख, खग निवांत शांत तरूलतांत,
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला ||३||

गीतः शांताराम नांदगावकर
संगीतः अरूण पौडवाल
गायकः सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल


( Talavyawar mendicha ajun rang ola - Shantaram Nandgaokar )

1 comment:

  1. खूप दिवसांचा शोध संपला शतशः धन्यवाद

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.