Sunday, March 20, 2011

चिंब भिजलेले रूप सजलेले - प्रविण दवणे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा,
तन मन फुलूवून जाती
ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा,
तन मन फुलूवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा,
रंग सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले , स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे


ओढ जागे राजसा रे, अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बनू आले
लाट हि , वादळी , मोहुनी गाते
हि मिठी लाडकी भोवरा होते.
पडसाद भावनांचे , रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

घेऊन ओले पंख आले रूप हे सुखाचे
रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नाचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भरजरी वेल हे ताल छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन अंतर दरवळणारा
हि स्वर्ग सुखाची दारे,
हे गीत प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

गीत : प्रविण दवणे
स्वर : शंकर महादेवन
संगीत : अजय अतुल


( Chimb Bhijalele roop sajalele , barasuni aale, rang preetiche - Pravin davane )

1 comment:

  1. अप्रतिम.
    फार दिवसापासून शोधात होतो ...
    धन्यवाद

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.