Monday, March 14, 2011

जेव्हा तुझ्या बटांना - मंगेश पाडगावकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
गायक : सुरेश वाडकर


( Jevha tuzya batanna udhali mujor wara - Mangesh Padgaokar )

2 comments:

  1. तुझे मी कितीदा आभार मानू शंतनू?! इतकी सुंदर सुंदर गाणी ऐकवतोयस ना!
    धन्यवाद मित्रा.
    :)

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.