Monday, March 7, 2011

कुठे शोधिसी रामेश्वर - मंगेश पाडगांवकर

( ऑडीओ सहित )
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहीले डोळे उघडून
वर्षाकाठी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशासी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती,पिकविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासून जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी

देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी

गायक :सुधीर फडके
गीत : मंगेश पाडगांवकर
संगीत : यशवंत देव
( Kuthe Shodhisi Rameshwar an kuthe shodhisi kashi - Mangesh Padgaokar)

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.