Saturday, March 5, 2011

पाऊस कधीचा पडतो - ग्रेस

( ऑडीओ सहित )
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने

डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

गायक : पद्मजा फेणाणी / अनुराधा पौड्वाल
गीत : ग्रेस
संगीत : यशवंत देव
( Paus Kadhicha padato - Grace )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.