Thursday, March 3, 2011

पाऊस असा रुणझुणता - संदीप खरे

( ऑडीओ सहित )
पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली,
पाऊल भिजत जाताना, चाहूल विरत गेलेली ||ध्रु||

ओलेत्याने दरवळले, अस्वस्थ फुलांचे घोस,
ओलांडून आला गंध, नि:स्तब्ध मनाची वेस ||१||

पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणींचा,
कधी उधाणता अन केव्हा थेम्बांच्या संथ लयीचा,
पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली,
पाऊल भिजत जाताना, चाहूल विरत गेलेली ||२||


नभ नको नको म्हणताना, पाऊस कशाने आला,
गात्रांतून स्वच्छंदी अन, अंतरात घुसमटलेला ||३||

स्वर्-सलील कुलकर्णी
गीत-संदीप खरे
( Paus asa runzunata painjane sakhichi smarali - Sandeep Khare )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.