Sunday, February 27, 2011

मन - राघवेंद्र तारे

मुक्त माझे मन
त्याला उडायचंय वाऱ्यावर

वाऱ्याचे झोके अंगावर घेत
दिसेल जे वाटेत आपल्या मुठीत घेत
अनुभव घ्यायचं त्या प्रत्येक गोष्टीचा
प्रत्येक विचित्र दिवसाचा तसेच रात्रीचा

झेप का एकदा घेतली मनाने
मनाच्या मनात कधी येउच नये थांबणे
ना झाडांचा अडकाव ना नद्यांची एकच दिशा
ऐकून आतली हाक, फक्त आणि फक्त उडतच जाणे

मनात येईल ते करत जावं
वाटेल तिकडे सुसाट पळावं
आणि या अंतर्ध्वनीच्या आवाजात
नाचत बागडत उडत खेळावं

कधी अंगावर विचारांची थेंब पडावी
आणि हीच थेंब घेऊन एक नक्षीदार तळच बांधावं
न्यावं हे तळ अशा एका ठिकाणी
पक्ष्यांच्या किलबिलाटात होतील ,
या तळरुपी कवितांची सुंदर सुरेल गाणी !!!

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.