Tuesday, February 22, 2011

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो - प्रसन्न शेंबेकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो

सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो

मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो?

खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे
ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो

हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी
आज दुःखाला जरासा वाव देतो

गीत - प्रसन्न शेंबेकर
संगीत - विवेक काजरेकर
स्वर - सुरेश वाडकर
( Mi Vyathanna Antariche gaav deto - Prasanna Shembekar Sung By Suresh Wadkar )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.