Sunday, February 20, 2011

विठ्ठला, तू वेडा कुंभार - ग. दि. मा

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥

माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥

घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥

तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥

गीत – ग. दि. माडगुळकर
गायक – सुधीर फडके
संगीत - सुधीर फडके


( Vitthala Tu veda Kumbhar - Ga D Madgulkar )

2 comments:

  1. सुंदर खूप दिवसांनी गाणी बघितले. खरच त्या काळातल्या कलाकारांना मानले पाहिजे. कृष्णधवल जमान्यात आणि अत्यंत कमी साधनामध्ये त्यांनी अश्या अजरामर निर्मिती केल्या.
    छान असे विडीओ शेअर केल्याबद्दल.

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.