Thursday, February 17, 2011

विठ्ठला- कोणता झेंडा घेऊ हाती - अरविंद जगताप

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचा-या जळति वाती,
वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्या गत व्यर्थ हो जगनं, उभ्या उभ्या संपून जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती,
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रिती, विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?


गीत - अरविंद जगताप
संगीत - अवधूत गुप्ते
स्वर - ज्ञानेश्वर मेश्राम


( Vitthala konata mi zenda gheu hati - Arvind Jagtap)

2 comments:

 1. गीत अप्रतिम आहे...आणि अवधूतचं हे संगीत त्या गीताला उचलून नेणारं आहे...त्यामुळे गाणं अतिशय परिणामकारक झालंय.
  आभार शंतनू. :)

  ReplyDelete
 2. वाह वाह काय मस्त लिहिलं आहे. अगदी समर्पक !
  "पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
  उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचा-या जळति वाती"

  ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.