Friday, February 4, 2011

खोडी माझी काढाल तर - शांता शेळके

( ऑडीओ सहित )
खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट,
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट !

अंगावरती याल तर असा देइन ठोसा,
कोपऱ्यात जाउन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा !

बजरंग माझा भाऊ भीम माझा काका,
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका, वाटे जाऊ नका !

दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो,
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भीतो, मग कोण भीतो ?

गीत - शांता शेळके
संगीत - मीना खडीकर
स्वर - योगेश खडीकर
( Khodi mazi kadhal tar - Shanta Shelke )

3 comments:

  1. इयत्ता २रिचा नाच होता आमच्या वर्गाचा....धन्यवाद.. मुलीला शिकवता येईल.

    ReplyDelete
  2. मस्त मस्त!! आभार! :)

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद !

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.