Saturday, January 29, 2011

अताशा असे हे - संदीप खरे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शून्य शब्दात येते

कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळूवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

कधी एकू येता क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातून ज्या रोज जातो बुडोनी
नभाशीच त्या मागू जातो किनारा

न अंदाज कूठले न अवधान काही
कुठे जायचे यायचे भान नाही
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही

कशी ही अवस्था कुणला कळावी
कूणाला पुसावी ? कुणी उत्तरावी ?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे !

गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुळकर्णी
गायक - सलील कुळकर्णी


( Atasha ase he mala kaay hote - Sandeep khare )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.