Monday, December 20, 2010

पैठणी - शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा

वरील कविता माझ्या बाबांनी सांगितली आणि मी लिहून घेतली , त्यात काही चुका असण्याची शक्यता आहे . काही चूक सापडल्यास कृपया कळवावे.

( Paithani - shanta shelke )

9 comments:

 1. सुंदर! मला तुझं खूप कौतुक वाटतं शंतनू! आणि मनापासून आभार. :)

  ReplyDelete
 2. धन्यवाद अनघा ! तू नेहमीच हा ब्लॉग वाचतेस त्याबद्दल आभार . हा ब्लॉग एक निमित्त आहे ज्यामुळे मला सुद्धा जुनी छान छान गाणी, जुन्या नव्या छान कविता पुन्हा पुन्हा वाचता येतात, ऐकता येतात. खूप खुप आभार !

  ReplyDelete
 3. शंतनू ही कविता मी कधीपासून शोधत होते....म्हणून सगळ्यात आधी तुझे आभार ..पण एकच सांगायचं आहे ...सौभाग्य मरण नसून त्याजागी "अहेवपणी मरण आले ,आजीचे माझ्या सोने झाले " अशी दुरुस्ती आहे.(अहेवपणी म्हणजे पती जिवंत असताना )तुझा ब्लॉग मस्त आहे .

  ReplyDelete
 4. मृदु ,सर्वप्रथम तुझे खूप खूप आभार. चुकीची दुरुस्ती केली आहे.

  ReplyDelete
 5. धन्यवाद !! मला दोन गझल हव्या होत्या -पहिली म्हणजे "सलोना सा साजन (आशा भोसले) "आणी "राज की बाते लिखी (गुलाम अली)"
  जर तू ब्लॉगवर या गझल टाकल्यास तर क्या बात है!!!

  ReplyDelete
 6. woooow!! very nice blog. I have become big fan of this in a first visit!!!

  ReplyDelete
 7. आम्हला इयत्ता वी च्या अभ्यासक्रमात होती ही कविता, मला खूप आवडायची ती.
  माफ करा त्यात काही सुधार सुचवायचे आहेत,

  पैठणीने जपले
  एक तन.. एक मन..
  अत्तराने माखली बोटे.....

  असे काहीसे ते शब्द आहेत असे आठवते आहे, कृपया एकदा तपासून घ्यावे.

  ReplyDelete
 8. अत्तराने माखली बोटे..... nahi
  खस-हीन्यात माखली बोटें

  ReplyDelete
 9. khas-hinyaat maakhalI bote
  paithani la kevhaa pusali


  paithanichya avatibhavati
  daravaLanaara "sukshma" waas

  ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.