Sunday, December 19, 2010

गढी - केशवसुत

गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी
भिंती ढासळल्या बुरुज खचले ये खालती देवडी

कुत्रे हे पेंगतसे करीतसे दिंडी पुढे राखण
जाऊ डावलुनी त्यास पुढती पाहू गढी आपण

होते राहात या गढीत ईथले पाटील मातब्बर
पाठी वाकवूनी त्यास मुजरे देती किती यस्कर

होते वाजत धडांग धीदिन्धा दिंडी पुढे चौघडे
घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे

वैऱ्याला शह देत येथे भगवा झेंडा डूलावा पण
ती काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण

वरील कविता माझ्या बाबांनी सांगितली आणि मी लिहून घेतली , त्यात काही चुका असण्याची शक्यता आहे . काही चूक सापडल्यास कृपया कळवावे.

( Gadhi - Keshavsut )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.