Wednesday, December 15, 2010

घर थकले संन्यासी - ग्रेस

( ऑडीओ - सहित )
घर थकले संन्यासी ; हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते

पक्षांची घरटी होती ; ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झ-र्यांचे पाणी

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई

गीत - ग्रेस
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
( Ghar thakalele sanyasi, halu halu bhint hi khachate ...)
(Thanks to Anamika for the Audio source)

1 comment:

  1. छान ब्लॉग आहे तुमचा :-)

    माझ्या ब्लॉगचा पत्ता:
    http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.