Wednesday, May 19, 2010

फिटे अंधाराचे जाळे - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी ही नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

गायक - श्रीधर फडके( Fite andharache jale, zale mokale akash )

2 comments:

  1. छान आहे संकल्पना. खूपच आवडली.

    ReplyDelete
  2. खरचं खुप छान....

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.