Friday, May 14, 2010

अनंता तुला कोण पाहु शके - बा.भ. बोरकर

( ऑडीओ सहित )
अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे

तुझा ठाव कोठे कळेना जरी
गमे मानसा चातुरी माधुरी
तरू वल्लरींना भुकी मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे

फुले सृष्टीची मानसा रंजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके

तुझे विश्व ब्रम्हांडही निःस्तुला
कृति गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके

नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू कल्पना जल्पना त्या हरो

गायक - पं. जितेंद्र अभिषेकी


वरील कविता श्री. सुधीर भिडे यांच्या सहयोगानी
( Ananta tula kon pahu shake )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.