Sunday, May 9, 2010

मन तळ्यात मळ्यात - संदीप खरे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
मन तळ्यात मळ्यात,
जाईच्या कळ्यात…

मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात…

ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात…

इथे वार्याला सांगतो गाणी, माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात…

रात भिडू लागे अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभात !…

माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्यात…


( Man talyat malyat , jaaichya kalyat )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.