Friday, April 16, 2010

एवढे दे पांडुरंगा - सुरेश भट

माझिया गीतात वेडे दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या अमॄताचे फूल यावे !

आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा !

स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी !

एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला;
नामयाहाती बनावे हे जिणे गोपाळकाला !

माझियासाठी जगाचे रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे !

मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात मझ्या मी मला वाटून द्यावे !

ह्याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडीला हा मी तुझ्या दारात दंगा !
( Evadhe de panduranga )

2 comments:

 1. shri Shantanu Deo your choice shows you have the heart of a poet,emotions of an artist.I could listen to only Marathi part of it. It's a treasure

  Jayant Puranik

  ReplyDelete
 2. कौतुकाची एक थाप,
  बाकी सगळं क्षणिक ,
  आभाराचं एक पत्र,
  धन्यवाद मिस्टर पुराणिक !

  ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.