Tuesday, April 6, 2010

हारलेले डाव - सुरेश भट

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते
कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते

तो कसा बाजार होता, ती कशी होती दुकाने
रक्त होते एक ज्याचे वेगळाले भाव होते

प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला
ओळखीच्या माणसांचे ओळखीचे गाव होते

ते ना होते , नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे
ते फुलांच्या लाजण्यांचे लाघवी घेराव होते

राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला
घेतले जे श्वास ते हि - हारलेले डाव होते

( ya nadichya paar tethe , Ek maze gav hote )

4 comments:

 1. Hi,

  This is really good ghazal.

  Has anyone sung it? if yes please tell me who and where can I listen it.

  ReplyDelete
 2. Mi evadhe diwas je shodhat hoto te ajj milal thank u so much.....hi gazal lyrics lihun theavlyabaddal.....

  ReplyDelete
  Replies
  1. हृदयनाथ यांनी संगीत दिले आहे याला व त्यांच्या मुलाने बैजनाथने गायले आहे पण ते उपलब्ध नाही होत

   Delete
  2. https://www.youtube.com/watch?v=V-uBDzdO6-c

   Delete

Please comment. Your review is very important for me.