Monday, March 29, 2010

बगळ्यांची माळ फुले - वा. रा. कांत

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत
भेट आपुली स्मरशी काय तूं मनात ॥धृ.॥

छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानांत खुले उन अभ्रकाचें,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥१॥

त्या गांठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनीं भर दिवसा झालीं,
रिमझिमतें अमृत ते कुठुनि अंतरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥२॥

हातांसह सोन्याची सांज गुंफतांना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजतांना,
कमळापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यांत,
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥३॥

तूं गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणें पंखांचें शुभ्र उरें मागें,
सलते ती तडफड का कधिं तुझ्या उरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥४॥

2 comments:

  1. mastach!
    Rahul Deshpandecha video youtubene delete kela aahe. :(
    audio file kuthe aahe?

    ReplyDelete
  2. धन्यवाद मीनल . वसंतरावांच गाणं टाकतोय आज . राहुल ची गायकी मला फार आवडत नाही. माझं वैयक्तिक मत बरं का ! एक दोन मैफिली ऐकल्या आहेत मी त्याच्या . पण Style मारण्यापलीकडे फार काही आवाजावर control आहे असं वाटत नाही . बर्याच वेळा बेसूर सुद्धा होतो. पुष्कर सुद्धा कणसुर गातो बर्याच वेळा . पण प्रामाणिक पणे गाण्याचं प्रयत्न करतो. अर्थात पुन्हा एकदा सांगतो . हे माझा वैयक्तिक मत आहे .

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.