Saturday, March 6, 2010

या चिमण्यानो परत फिरा-ग.दि.माडगुळकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नको रे आईपासून दूर
चुकचुक करते पाल उगीचच चिंता मज लागल्या
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या

इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई
अजून आहे उजेड इकडे, दिवसही सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अजून कुठे गं, तळाकडे उतरल्या
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या

अवती भवती असल्यावाचून, कोलाहाल तुमचा
उरक नं होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा
या बाळानो, या रे लौकर, वाटा अंधारल्या
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या
संगीत - श्रीनिवास खळे ; गायक - लता मंगेशकर


( Ya chimanyanno parat fira )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.